How to Download GST Certificate? हा प्रश्न अनेक व्यापाऱ्यांसाठी महत्वाचा असतो, कारण GST Certificate हे व्यवसायाच्या कायदेशीर ओळखीसाठी आणि करदायित्वांच्या पूर्ततेसाठी आवश्यक आहे. जीएसटी नोंदणीसाठी सरकारने एक साधी आणि सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही.
नोंदणी केल्यानंतर, तुम्ही GST नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देखील डाउनलोड करू शकता. यासाठी अर्ज केल्यानंतर मिळालेली पावती तुमच्याकडे उपलब्ध असावी. आपण जीएसटी चे ऑनलाइन अधिकृत पोर्टल वापरून GST Certificate Download करू शकतो त्यासाठी मी खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा आणि GST प्रमाणपत्र घरबसल्या डाउनलोड करा.
जीएसटी (GST) प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे? (How to Download GST Certificate)
जीएसटी नोंदणी करणे सर्व व्यावसायिकांसाठी अनिवार्य आहे जे त्यांच्या व्यवसायात TDS गोळा करतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात त्यांची उत्पादने पुरवणाऱ्या व्यवसायांसाठी, ई-कॉमर्स ऑपरेटरसाठी किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वस्तू किंवा सेवा पुरवणाऱ्या व्यवसायांसाठी GST प्रमाणपत्र आवश्यक आहे.
जर तुम्हीही जीएसटी नोंदणी केली असेल, तर तुम्ही अधिकृत पोर्टलवरून प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. How to Download GST Certificate साठी खालील स्टेप्स फॉलो करा –
१) जीएसटी (GST) प्रमाणपत्र डाउनलोड करायचे असेल तर सर्वात पहिले GST च्या अधिकारीक वेबसाईट https://www.gst.gov.in/ यावर जावे.
२) वेबसाईट ओपन झाल्यावर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात Login पर्याय आहे त्यावर जाऊन युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
३) Login झाल्यावर Service Menu पर्यायावर जा आणि User Service चा सेक्शन शोधा.
४) आता User Service सेक्शन मधून View/Download Certificates हा पर्याय शोधावा आणि यावर क्लिक करावे.
५) View/Download Certificates यावर गेल्यावर Download चे बटन दिसेल त्यावर क्लिक करावे.
६) क्लिक केल्यावर GST प्रमाणपत्र डाउनलोड होईल, अश्या प्रकारे तुम्ही तुमचे GST नोंदणी प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
टीप – GST भारतीय कायद्यानुसार GST प्रमाणपत्राची वैधता 90 दिवस असते. त्यामुळे या वेळेत नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या व्यक्तीने वेळेनुसार जीएसटी प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले नाही तर त्याची वैधता संपते. मात्र, नूतनीकरण करून वैधता वाढवता येते.
GST Registration Certificate Download करण्याची प्रक्रिया सोपी आहे जी तुम्ही काही मिनिटांत पूर्ण करू शकता. वरील चरणांचे अनुसरण करून, तुम्ही तुमचे प्रमाणपत्र त्वरित आणि सहजपणे मिळवू शकता.
मी आशा करतो की How to Download GST Certificate हि ब्लॉग पोस्ट तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. तुम्हाला जीएसटीशी संबंधित इतर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास, कृपया मला कमेंट करून कळवा.