HSC Result Check 2024 [Link]: बारावीचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा?

WhatsApp Group Join Group

HSC Result Check 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे आयोजित इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आता, सर्व विद्यार्थी उत्सुकतेने महाराष्ट्र HSC निकाल 2024 च्या प्रतीक्षेत आहेत.

बारावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना आता जास्त वाट पाहण्याची आवश्यकता नाही कारण आज म्हणजे 21 मे 2024 रोजी HSC Result 2024 जाहीर होणार अशी अधिकारीक सूचना महाराष्ट्र बोर्डाने केली आहे. तुम्हीही 12वीचे विद्यार्थी असाल आणि तुम्ही बोर्डाची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत असाल आणि तुमचा निकाल कसा पाहायचा याची तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करू नका!

आज या ब्लॉग पोस्टमध्ये, मी तुम्हाला HSC Result Check 2024 Maharashtra Board ऑनलाइन आणि SMS द्वारे कसा पहायचा. HSC Result 2024 Maharashtra Board Download कसा करायचा याची सोपी प्रक्रिया सांगणार आहे. मला आशा आहे कि या पोस्टच्या मदतीने तुम्ही तुमचा HSC Result Check 2024 सहजपणे आणि जलदतेने पाहू शकाल आणि डाउनलोड करू शकाल. तर चला पोस्ट सुरु करूयात.

HSC Result Check 2024: बारावीचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांना आता जास्त वाट पाहण्याची आवश्यकता नाही कारण आज म्हणजे 21 मे 2024 रोजी दुपारी १ वाजता HSC Result 2024 जाहीर होणारआहे. जर आपल्याला पण आपला निकाल पाहायचा असेल तर हि पोस्ट तुमच्यासाठीच आहे. यामध्ये आपण बारावी परीक्षा निकाल २०२४ कसा पहावा? आणि डाउनलोड करावा हे जाणून घेणार आहोत. आपण HSC Result 2024 Maharashtra Board हा दोन मार्गांद्वारे पाहू शकतो ते खालीलप्रमाणे –

१) अधिकारीक वेबसाईट (ऑनलाईन)

HSC Result 2024 ऑनलाईन पाहण्याचा हा मार्ग आहे. आपण अधिकारीक वेबसाईट चा वापर करून बारावीचा निकाल पाहू शकता त्यासाठी खालील स्टेप्स नुसार प्रक्रिया करा.

  • सर्वात पहिले आपल्या डिवाइस वरील ब्राउजर ओपन करावे आणि HSC Result Check 2024 ची अधिकारीक वेबसाईट mahresult.nic.in यावर जावे.
  • आता वेबसाईट च्या होम पेज वरती असलेल्या Maharashtra HSC Result 2024 च्या लिंक वरती क्लिक करावे.
  • पुढे एक फॉर्म ओपन होईल त्यात विचारलेली माहिती जसे रोल नंबर आणि आईचे नाव भरावे आणि सबमिट वरती क्लिक करावे.
  • आता तुमचा निकाल आता समोर दिसेल तो चेक करावा आणि डाउनलोड करून घ्यावा.

२) एसएमएस (ऑफलाईन)

SMS चा मार्ग अश्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही. SMS द्वारे निकाल चेक करण्यासाठी आपल्याला एक मेसेज पाठवायचा आहे 57766 या नंबर वरती. तो मेसेज खालीलप्रमाणे दिसेल.

MHSSC <रोल नंबर>

वरीलप्रमाणे मेसेज टाईप करून रोल नंबर च्या ठिकाणी आपला नंबर टाकावा आणि मेसेज पाठवावा. थोड्याच वेळात आपला निकाल आपल्याला मेसेज द्वारे पाठवला जाईल.

HSC Result 2024 Maharashtra Board जाहीर झाल्यावर अनेकदा निकालाच्या वेळी अधिकृत वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात वाहतूक झाल्याने ती बंद किंवा हळूहळू चालायला लागते. यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यास अडचण निर्माण होते अश्या वेळी काय करावे? त्यासाठी खालील गोष्टी वाचा –

काही वेळ वाट पाहून पुन्हा प्रयत्न करा वेबसाइटवर अचानक जास्त गर्दी झाल्याने वेबसाईट बंद पडते त्यामुळे काही वेळ थांबून परत प्रयत्न करावा किंवा वेगवान इंटरनेट वरून प्रयत्न करावा.

दुसऱ्या वेबसाइटचा वापर करा तुम्ही निकाल पाहण्यासाठी दुसऱ्या वेबसाईट चा वापर करू शकता. अजून निकालाच्या वेबसाईट जाहीर झालेल्या नाहीत जाहीर झाल्यावर येथे अपडेट करण्यात येईल.

SMS चा वापर करा – तुम्ही SMS द्वारे तुमचा निकाल मिळवू शकता. ते कसे करायचे हे मी वरती सांगितले आहे.

तुमच्या शाळेशी संपर्क साधा – जर तुम्हाला अजूनही तुमचा निकाल मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या शाळेशी संपर्क साधू शकता आणि ते तुम्हाला मदत करू शकतात का ते पाहू शकता.

Maha Board Official Websitemahresult.nic.in
Maharashtra HSC Result 2024 Links1) mahresult.nic.in
2) hscresult.mkcl.org
3) mahahsscboard.maharashtra.gov.in
4) results.nic.in
5) mahahsc.in
6) mahahsscboard.in
HomepageRahulHelps.in

निष्कर्ष

आज या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड एचएससी परीक्षा निकाल २०२४, HSC Result Check 2024 Maharashtra Board कसा तपासायचा याबद्दल माहिती दिली आहे. मला आशा आहे कि याच्या मदतीने तुम्ही यशस्वीपणे निकाल पाहू शकाल.

मी तुम्हाला अधिकृत वेबसाइटचा वापर करून आणि SMS द्वारे तुमचा निकाल कसा पाहू शकता याची तपशीलवार माहिती प्रदान केली आहे.मी आशा करतो कि तुम्हाला HSC Result Check 2024 करण्यात काहीही अडचण येणार नाही आणि जर आलीच तर खाली कमेंट करून विचारायला संकोच करू नका. धन्यवाद!

Leave a Comment