Aadhaar Card Download Online: मोबाईल वरून ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड कसे करावे?

WhatsApp Group Join Group

Aadhaar Card Download Online Marathi – आधार कार्ड हे देशातील नागरिकांचे ओळखपत्र आहे. भारतातील नागरिकांसाठी हे एक महत्वाचे कागदपत्र आहे जे सरकारने सर्वांसाठी अनिवार्य केलेले आहे. आज सर्व सरकारी कामासाठी सर्वात पहिले आधार कार्ड मागितले जाते, कारण ते सिध्द करते की तुम्ही भारताचे नागरिक आहात. भारतात आधार कार्डशिवाय कोणतेही काम करता येत नाही.

श्रीमंत असो किंवा गरीब, सर्वांसाठी आधार कार्ड तेवढेच महत्वाचे आहे. बँक खाते खोलायचे असो किंवा रेशन कार्ड काढायचे असो, सर्व ठिकाणी याची आवश्यकता असतेच. जर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेण्याचा असेल तरीही आधार कार्ड असावे लागते. त्यामुळे आजच्या या पोस्टमध्ये आपण ऑनलाईन आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे? हे पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात.

Aadhaar Card Download Online: मोबाईल वरून ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड कसे करावे?

आज असे अनेक आधार कार्डधारक आहेत ज्यांचे आधार कार्ड हरवले आहे किंवा काही कारणास्तव उपलब्ध नाही, तर मी त्यांना अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे, तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Aadhaar Card Download Online: आवश्यक गोष्टी

आधार कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया पाहण्याआधी आपण त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी पाहुयात. ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते –

  • मोबाईल नंबर: आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाईल नंबर.
  • आधार नंबर/एनरोलमेंट आयडी: 12-अंकी आधार क्रमांक किंवा 14-अंकी एनरोलमेंट आयडी.
  • OTP: तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी.
  • PDF पासवर्ड: आधार कार्ड PDF फाईल उघडण्यासाठी लागणारा पासवर्ड (नावाची पहिली चार अक्षर आणि जन्मवर्ष)

Aadhaar Card Download Online: प्रक्रिया

ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा आणि तो आपल्या जवळ असावा, म्हणजे ओटीपी पडताळणी करता येते. आपण मोबाईल वरूनच घरबसल्या आधार कार्ड डाउनलोड करू शकतो, ज्याची प्रक्रिया मी खाली स्टेप नुसार दिली आहे.

१) UIDAI वेबसाईट खोला – ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा UIDAI द्वारे देण्यात आलेली आहे त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ब्राउजर खोला आणि त्यावर UIDAI ची अधिकृत वेबसाईट उघडा.

Aadhaar Card Download

२) My Aadhaar पर्याय निवडा – UIDAI ची अधिकृत वेबसाईट उघडल्यावर त्यात Get Aadhaar हा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.

Aadhaar Card Download

Get Aadhaar या पर्यायावर जा आणि त्यात Download Aadhaar हा पर्याय आहे तो निवडा.

Aadhaar Card Download

३) Aadhaar Details प्रविष्ट करा – दिलेल्या जागेत 12 अंकी आधार क्रमांक किंवा Enrollment ID किंवा Virtual ID यापैकी जे असेल ते भरा आणि Captcha भरून Sent OTP पर्याय निवडा.

Aadhaar Card Download

४) मोबाईल वर आलेला ओटीपी टाका – आता आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल वरती OTP येईल तो दिलेल्या जागेत प्रविष्ट करा आणि Verify & Download या पर्यायावर जा.

Aadhaar Card Download

Do you want a Masked Aadhaar – आपल्याला जर Masked Aadhaar Card लागत असेल तर हा पर्याय वर टिक करा. Masked Aadhaar मध्ये सुरक्षेसाठी आधार क्रमांक लपवलेला असतो

५) Aadhaar PDF फाईल डाउनलोड – Verify & Download पर्याय निवडल्यानंतर तुमचे आधार कार्ड मोबाईल वरती डाउनलोड होईल.

Aadhaar Card Download

PDF फाईल ला पासवर्ड असेल त्यासाठी तुमच्या नावाची पहिले ४ अक्षर आणि जन्मवर्ष टाकावे.

उदा… तुमचे नाव Rahul आणि जन्मवर्ष 2001 असेल तर तुमचा पासवर्ड RAHU2001 असेल.

Aadhaar Card Download Online: महत्त्वाच्या टिप्स

  • भाषा निवडा: तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करताना English किंवा अन्य कोणतीही प्रादेशिक भाषा निवडू शकता.
  • PDF फाईल पासवर्ड: आधार कार्डाची PDF फाईल उघडण्यासाठी लागणारा पासवर्ड लक्षात ठेवा.
  • PDF सेव्ह करा: तुम्ही डाउनलोड केलेले आधार कार्ड सुरक्षितपणे ऑफलाइन सेव्ह करून ठेवा.

Aadhaar Card Download Online: निष्कर्ष

आधार कार्ड अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे. जे अनेक गोष्टींमध्ये वापरले जाते. जर आधार कार्ड हरवले किंवा खराब झाले असेल तर या लेखात दिलेल्या प्रक्रियेनुसार आपण आधार कार्ड डाउनलोड करू शकता. आजचा Aadhaar Card Download Online हा लेख वाचून प्रक्रिया अतिशय सोपी आहे हे तुम्हाला कळले असेलच.

वरील प्रक्रिया वापरून आधार कार्डची PDF डाउनलोड करा आणि नंतर त्याची प्रिंट काढून घ्या. मला आशा आहे की आपल्याला Aadhaar Card Download Online कसे करावे हा लेख आवडला असेल. आजचा लेख सोशल मीडियावर नक्की शेअर करा आणि आमचा Whatsapp Group जॉईन करा.

Leave a Comment