Aadhaar Card Mobile Number Check: आधार कार्डला कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे? असा करा चेक

WhatsApp Group Join Group

Aadhaar Card Mobile Number Check: आधार कार्ड हे आपल्या देशात एक ओळखपत्र म्हणून वापरले जाते. बँक खाते खोलताना, नोकरीसाठी, किंवा पासपोर्ट बनवताना, ई ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड मागितले जाते. आधार कार्ड असण्यासोबत त्याला मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असल्याने ओटीपी पडताळणी करणे शक्य होते, म्हणजे आधार कार्डशी लिंक असलेल्या सर्व सेवांसाठी हे सुरक्षा कवच म्हणून काम करते.

आपण जर आधार कार्डचा मोबाईल नंबर बदलला असेल किंवा आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे माहित नसेल तर ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे. आजच्या लेखात मी Aadhaar Card Mobile Number Check कसा करायचा हे सांगणार आहे. आधार कार्ड वरील नंबर चुकीचा असेल तर अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे आपण वापरत असलेला नंबरच आधारला लिंक असावा. तर चला पाहुयात तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे?

Aadhaar Card Mobile Number Check: आधार कार्डला कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे? असा करा चेक

आधार कार्डवर तुमचा मोबाईल नंबर अपडेट असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण, अनेक सेवांसाठी आधार कार्डला तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. तर चला जाणून घेऊया, आधार कार्डवरील मोबाईल नंबर कसा चेक करायचा.

१) uidai.gov.in ला भेट द्या.

aadhaar card mobile number check

Aadhaar Card Mobile Number Check करण्याची सुविधा हि सरकारने अधिकारीक वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली आहे. आधार कार्डला कोणता मोबाईल क्रमांक लिंक आहे जे जाणून घेण्यासाठी सर्वात पहिले आधार सेवांच्या आधिकरिक वेबसाईट https://uidai.gov.in वरती जा.

२) Verify Aadhaar पर्याय निवडा.

aadhaar mobile check

आधार ची अधिकारीक वेबसाईट खुली झाल्यावर तुम्हाला त्यात My Aadhaar हा पर्याय मेनूमध्ये दिसेल. त्यात आधार संबंधित उपलब्ध असलेल्या सर्व सेवांचे पर्याय असतील. त्यातून आता My Aadhaar पर्यायातून Verify an Aadhaar Number हा पर्याय निवडायचा आहे.

३) Check Aadhaar Validity वरती क्लिक करा.

aadhaar card mobile check

Verify an Aadhaar Number वरती क्लिक केल्यावर नवीन पृष्ठ खुले होईल. त्यात तुम्हाला खाली जाऊन Check Aadhaar Validity हा पर्याय शोधायचा आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे.

४) Aadhaar माहिती भरा.

aadhaar card mobile number check

या पुढच्या स्टेपमध्ये आपला आधार क्रमांक दिलेल्या जागेत म्हणजे Enter Aadhaar Number च्या ठिकाणी भरायचा आहे आणि Enter Captcha मध्ये Captcha Code टाकायचा आहे आणि पुढे Proceed बटन वरती क्लिक करायचे आहे.

५) Mobile Number पाहा.

aadhaar card mobile number check

Proceed वरती क्लिक केल्यावर आपल्या आधार कार्ड संबंधी माहिती येईल त्यात Age Band, Gender, State आणि शेवटी Mobile असेल. येथे आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर ची शेवटची तीन अंक दाखवली जातील.

निष्कर्ष

अश्या प्रकारे आपण आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल लिंक आहे जे माहिती करून घेऊ शकता. मला आशा आहे की आपल्याला हा लेख समजला असेल आणि आता तुम्ही सुद्धा ही प्रक्रिया करू शकता असे मला वाटते. अनेकांना माहित नसते कि त्यांच्या आधार कार्डला कोणता क्रमांक लिंक आहे त्यांच्यासाठी हा लेख आहे.

आजची Aadhaar Card Mobile Number Check हि पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि Aadhaar Card Mobile Number Check करताना काही अडचण आली तर कमेंट करून विचारा. या प्रकारच्या विविध सरकारी सेवांबद्दल माहितीसाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment