Ayushman (PMJAY) Card Download PDF: आयुष्मान कार्ड डाउनलोड कसे करायचे?

WhatsApp Group Join Group

Ayushman Card Download Online PDF: आपल्या  कुटुंबात अचानक आजारपण आले तर मोठा आर्थिक भार पडतो, अशा परिस्थितींमध्ये सरकारी योजना तुमच्या मदतीला येते. आयुष्मान भारत ही सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्य विमा प्रदान करते. या योजने अंतर्गत तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांचा लाभ मिळतो. या योजनेसाठी नोंदणी केल्यावर तुम्हाला एक कार्ड दिले जाते त्याला आयुष्मान कार्ड असे म्हणतात.

तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असल्यास तुम्ही देशभरातील निवडक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेऊ शकता. आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये मी तुम्हाला तुमचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्याची सोपी पद्धत सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. तुमचे आयुष्मान कार्ड बनवून तयार असल्यास ते Ayushman Card Download Online, PMJAY Card Download, PMJAY Gov In Card Download कसं करायचं आणि त्याची PDF कॉपी कशी जतन करायची त्याबद्दल मी खाली सांगितले आहे.

Emotional Miss U Aai Status in Marathi

Ayushman (PMJAY) Card Download PDF: आयुष्मान कार्ड डाउनलोड कसे करायचे?

तुम्ही तुमचे आयुष्मान भारत कार्ड (PMJAY Card) थेट तुमच्या फोनवर डाउनलोड करू शकता. ही सुविधा सरकारच्या नवीन पोर्टलवर उपलब्ध आहे. आयुष्मान भारत योजना अंतर्गत पाच लाखांपर्यंतच्या मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्याकडे हे कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमचे आयुष्मान कार्ड हरवले असेल किंवा अजून मिळाले नसेल तर ते तुम्ही खालील पायऱ्या फॉलो करून Ayushman Card Download PDF by Mobile Number करू शकता.

आयुष्मान कार्ड डाउनलोड पद्धत 1 –

ayushman card download

1) आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा संगणकामधील क्रोम ब्राउजर उघडावे लागेल.

2) ब्राउजर ओपन झाल्यानंतर सर्च बॉक्समध्ये bis.pmjay.gov.in टाइप करून सर्च बटणावर क्लिक करावे.

3) आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. या पेजवरील ‘Download Ayushman Card’ लिंकवर क्लिक करावे.

4) त्यानंतर Scheme मध्ये PMJAY निवडा, Select State मध्ये तुमच्या राज्याचे नाव निवडा, Aadhaar Number/ Virtual ID प्रविष्ट करा आणि Generate OTP बटणावर क्लिक करा.

5) तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, ज्याला निर्दिष्ट स्थानी टाकून वेरिफाय करावे.

6) OTP वेरिफाय झाल्यानंतर, एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला Ayushman Card PDF Download करण्याचा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.

आयुष्मान कार्ड डाउनलोड पद्धत 2 –

ayushman card download

1) आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या ब्राउजरमध्ये beneficiary.nha.gov.in उघडा.

2) आता तुमच्या समोर beneficiary.nha चे वेबसाइट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील: Login as, Beneficiary, Operator. यामध्ये Beneficiary पर्याय निवडा.

3) आता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे वेरीफाय करून लॉगिन करा.

4) यानंतर, एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला State, Scheme, District निवडावे लागेल.

5) त्यानंतर Aadhaar किंवा ID निवडा, ज्याद्वारे तुम्हाला सर्च करायचे आहे. आधार नंबर किंवा आयडी टाकल्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा.

6) त्यानंतर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची स्थिती दिसेल, जिथून तुम्ही सहजपणे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.

आजच्या या मार्गदर्शकाच्या मदतीने, तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड घरबसल्या सहजपणे डाउनलोड, Ayushman Card Download करू शकाल आणि योजनेचा लाभ घेऊ शकाल. हे कार्ड तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे आजच ते डाउनलोड करा आणि योजनेच्या सुविधांचा लाभ घ्या.

Ayushman Card Download Online, PMJAY Card Download आजचा हा लेख महत्वाचा वाटला असेल तर सोशल मीडियावर नक्की शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता. खालील लिंक वर क्लिक करून आमचा WhatsApp Group जॉईन करा.

Importat Links
Ayushman Bharat YojanaAyushman Card Apply Online
Ayushman Card Balance Check
Ayushman Bharat Hospital List
Ayushman Card Downloadbis.pmjay.gov.in
beneficiary.nha.gov.in
HomepageRahulHelps.in

Leave a Comment