Maharashtra HSC/12th Result 2024 | बारावी निकाल २०२४ महाराष्ट्र बोर्ड

WhatsApp Group Join Group

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) विविध परीक्षा केंद्रांवर 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 दरम्यान बारावी बोर्डाची लेखी परीक्षा पार पाडली. आता सर्व विद्यार्थी Maharashtra Board HSC Result 2024 वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी बोर्डाच्या शिक्षण मंडळाने 25 मे 2023 रोजी HSC Result 2024 म्हणजे बारावीचा निकाल जाहीर केला होता. महाराष्ट्र बारावी बोर्ड निकाल हा 21 मे 2024 रोजी म्हणजे उद्या लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर अधिकृत वेबसाईट वरती आपल्याला पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवनात दोन परीक्षा खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे दहावी आणि दुसरी बारावीची परीक्षा. या परीक्षेवरती विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य ठरत असते, त्यामुळे सर्वजण चांगला अभ्यास करून परीक्षा देतात आणि चांगल्यात चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बारावीची परीक्षा झाल्यापासून सर्व विद्यार्थी आणि त्यांचे घरचे आतुरतेने HSC Result 2024 ची वाट पाहतात. आज या लेखात आपण Maharashtra HSC/12th Result 2024 बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण बारावीचा निकाल कधी लागणार आणि निकाल कसा पाहायचा हे जाणून घेऊयात.

Maharashtra HSC/12th Result 2024 | बारावी निकाल २०२४ महाराष्ट्र बोर्ड

Board NameMaharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)
Exam NameMaharashtra Higher School Certificate (HSC)
Exam ModeOffline
Exam Dates21 February 2024 to 19 March 2024
Result Date21 मे 2024
Result ModeOnline
Websitemahresult.nic.in

Latest Updates Maharashtra HSC Result 2024

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावी बोर्डाचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार.
  • निकालाची तारीख आणि वेळ महाराष्ट्र बोर्डाने घोषित केली आहे, बातम्यांनुसार निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती
  • MSBSHSE कडून अधिकृत घोषणा आल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.

Date and Time of HSC Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाचा निकाल म्हणजे Maharashtra HSC/12th Result 2024 21 मे 2024 रोजी दुपारी १ वाजता लागणार आहे, १ च्या नंतर सर्व विद्यार्थी आपला निकाल पाहू शकाल.

निकालाची तारीख आणि वेळ महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केले आहेत, त्यामुळे Maharashtra HSC/12th Result 2024 Date and Time हा फिक्स आहे. उद्या Maharashtra HSC/12th Result 2024 लागल्यावर मी या पोस्टवर अपडेट करेल त्यामुळे हि पोस्ट सेव करून ठेवा.

Details Included in the 12th Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे जाहीर केल्या जाणार्‍या एच.एस.सी. (बारावी) परीक्षा 2024 च्या निकालात खालील तपशील समाविष्ट असतील –

  • Student’s Name Roll Number.
  • Father’s name and Mother’s name.
  • Subject-wise marks
  • Grades obtained in each subject
  • Total Marks and Percentage
  • Result Status

Qualifying Marks for HSC Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे आयोजित केल्या जाणार्‍या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. हे 35 टक्के गुण लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील मिळवलेल्या गुणाचे मिळून गुण असतात. उदाहरणार्थ, एखाद्या विषयात तुम्ही लेखी परीक्षेत 40 गुण मिळवले तर प्रात्यक्षिक परीक्षेत किमान 25 गुण मिळवणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचा त्या विषयातील सरासरी गुण 35 पेक्षा जास्त राहिल.

जर एखाद्या विद्यार्थ्याला एच.एस.सी. परीक्षेत 35 टक्के गुण मिळवण्यात अपयश आला तर तो विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकतो. हि परीक्षा बोर्डाच्या परीक्षेचाच एक भाग असते ज्याद्वारे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी मिळते.

How to Check HSC/12th Result 2024?

Maharashtra HSC/12th Result 2024 बारावीचा निकाल तपासण्याचे तीन मार्ग आहेत- Online, SMS द्वारे आणि डिजिलॉकर वापरून. ज्या विद्यार्थ्यांना नाही ते तरीही MHSSC वर 57766 वर मजकूर पाठवून त्यांचा निकाल पाहू शकतात. Digi Locker ॲप वरती तुम्ही प्रोफाइल बनवू करू शकता आणि त्यानुसार तुमचा निकाल पाहू शकता. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात –

  • बारावी निकाल पाहण्यासाठी सर्वात पहिले mahresults.nic.in या वेबसाईट ब्राउजर वरती खोलावी.
  • आता वेबसाईट च्या होम पेज वरील HSC 12th Result 2024 या लिंक वरती क्लिक करा.
  • येथे आपल्याला आईचे नाव आणि रोल नंबर विचारला जाईल तो व्यवस्थित भरा.
  • रोल नंबर आणि आईचे नाव भरल्यावर View Result बटन वरती क्लिक करा.
  • आता आपला निकाल दिसेल तो पाहावा आणि डाउनलोड करून घ्यावा.

टीप – 12th Result 2024 जाहीर झाल्यावर एकाच वेळी लाखोची गर्दी वेबसाईट वरती असते त्यामुळे mahresults.nic.in ओपन होत नाही म्हणून दिलेल्या दुसऱ्या वेबसाईट चा वापर करावा आणि त्या पण ओपन होत नसतील तर काही वेळ वाट पाहावी.

HSC Result Check 2024 [Link]: बारावीचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा?

Revaluation of HSC/12th Result 2024

तुम्ही तुमच्या HSC/12th Result 2024 वर समाधानी नसाल तर तुम्ही पुनर्मूल्यांकन/Revaluation साठी अर्ज करू शकता. पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेद्वारे तुमच्या उत्तरपत्रिकेचे पुन्हा एकदा मूल्यांकन केले जाते आणि मार्क वाढत असतील तर वाढून दिले जातात.

पुनर्मूल्यांकनासाठी पात्रता – बारावी बोर्डाच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण अपेक्षेपेक्षा कमी मिळाले आहेत ते पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील गुण वाढवण्यासाठी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात परंतु पुढील परीक्षेत त्यांना फक्त दोनच पुनः परीक्षा देण्याची संधी असते.

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा – Maharashtra HSC/12th Result 2024 जाहीर झाल्यावर काही दिवसांनी पुनर्मूल्यांकनाची अधिकृत घोषणा MSBSHSE द्वारे केली जाते. या घोषणेनंतर, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होते. अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यावर बोर्डाच्या अधीकृत वेबसाईट वर जा आणि पुनर्मूल्यांकनाच्या लिंक वरती क्लिक करा. तुमच्या लॉगिन आणि पुनर्मूल्यांकन करायचे असलेल्या विषयांची निवड करून पैसे भरा आणि फॉर्म सबमिट करा.

तुम्हाला तुमच्या Maharashtra HSC/12th Result 2024 साठी आवश्यक माहिती खालील लिंकमधून मिळवता येईल :

Maha Board Official Websitemahresult.nic.in
Maharashtra HSC Result 2024 Links1) mahresult.nic.in
2) hscresult.mkcl.org
3) mahahsscboard.maharashtra.gov.in
4) results.nic.in
5) mahahsc.in
6) mahahsscboard.in
HomepageRahulHelps.in

Conclusion

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे घोषित केल्या जाणाऱ्या Maharashtra HSC/12th Result 2024, बारावी निकाल 2024, HSC Result 2024 Maharashtra Board च्या संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला येथे मिळतील. परीक्षेच्या निकाल जाहीर झाल्यानंतर येथे अपडेट केले जाईल, त्यामुळे या पोस्टवर नियमित भेट देत रहा आणि माझ्याकडून तुम्हाला आजच्या HSC Result 2024 साठी शुभेच्छा!

Leave a Comment