Maza Ladka Bhau Yojana Marathi: आपल्या देशासाठी बेरोजगारी हि एक मोठी समस्या आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीची समस्या पाहता बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी सरकार अनेक योजना सुरु करीत आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारने माझा लाडका भाऊ योजना सुरु केलेली आहे. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि बारावी उत्तीर्ण असाल तर हि योजना तुमच्यासाठीच आहे.
काही दिवसापूर्वी सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती त्यात महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक साहाय्य देण्यात येत आहे, आणि आता सरकारने मुलांसाठी माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे मुलांना दरमहा १०००० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेबद्दल अनेक लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, ते दूर करण्यासाठी आपण या पोस्टमध्ये माझा लाडका भाऊ योजना बद्दल माहिती घेणार आहोत.
माझा लाडका भाऊ योजना/ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
लेखाचे नाव | माझा लाडका भाऊ योजना संपूर्ण माहिती |
योजनेचे नाव | माझा लाडका भाऊ योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्रातील बेरोजगार युवक |
आर्थिक मदत | 10,000 रुपये पर्यंत |
नोंदणी प्रक्रिया | ऑनलाईन |
आधिकारिक वेबसाइट | https://rojgar.mahaswayam.gov.in/ |
काय आहे माझा लाडका भाऊ योजना?
महाराष्ट्र सरकारने नुकतीच राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी माझा लाडका भाऊ योजना नावाची नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने राबवण्यात येत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सरकारने ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे हि योजना राबवण्यात येत आहे.
माझा लाडका भाऊ योजनेत पात्र युवकांना उद्योग महामंडळात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल आणि या सहा महिन्याच्या कालावधीसाठी युवकांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मंडळाकडून प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला जर युवकाचे काम आवडल्यास आणि युवकाची इच्छा असेल तर नोकरी दिली जाईल.
असे या योजनेचे स्वरूप आहे, लाडकी बहीण योजनेप्रमाणे फुकट पैसे मिळणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि हि योजना ६ महिन्यापर्यंतच आहे म्हणजे तुम्हाला फक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्या ६ महिन्यापुरते विद्यावेतन दिले जाणार आहे. तर चला आता या योजनेचा उद्देश पाहुयात.
माझा लाडका भाऊ योजनेचा उद्देश आणि लाभ
माझा लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाची योजना आहे. राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचे काही प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत –
- राज्यातील बेरोजगारी कमी करणे – माझा लाडका भाऊ या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- युवांचा कौशल्य विकास – युवकांना विविध क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार बाजारात अधिक स्पर्धात्मक बनवले जाते.
- उद्योजकता विकास – या योजनेद्वारे काही युवकांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित करून स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली जाते.
- समाजात सकारात्मक बदल – युवकांना रोजगार मिळाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावते.
या सोबतच प्रशिक्षण दरम्यान युवकांना विद्यावेतन देण्यात येणार आहे ज्याचे स्वरूप खालीलप्रमाणे –
क्रमांक | शिक्षण | प्रतिमाह विद्यावेतन |
---|---|---|
१ | बारावी पास | ६,००० रुपये |
२ | ITI/ डिप्लोमा | ८,००० रुपये |
३ | पदवीधर/ पदव्युत्तर | १०,००० रुपये |
माझा लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता
माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. जर कोणत्याही उमेदवाराने पात्रता पूर्ण केली नाही तर तो या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही आणि त्याने अर्ज केल्यास त्याचा अर्ज रद्द केला जाईल. माझा लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे –
- उमेदवार युवक महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
- उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे.
- उमेदवार किमान बारावी पास असावा आणि कोणतेही शिक्षण चालू नसावे.
- उमेदवाराच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे.
- उमेदवाराला इतर कोणत्याही भत्ता योजनेचा लाभ मिळत नसावा.
माझा लाडका भाऊ योजना नोंदणी प्रक्रिया
जर आपण महाराष्ट्र राज्याचे तरुण नागरिक असाल आणि माझा लाडका भाऊ योजनेंतर्गत वरती दिलेले पात्रता निकष पूर्ण करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरबसल्या सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता. माझा लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.
- माझा लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल – https://rojgar.mahaswayam.gov.in/
- अधिकारीक वेबसाइटच्या होम पेजवर गेल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना साठी Register करण्याचा पर्याय मिळेल ज्यावर Register करावे आणि नंतर लॉगिन करावे.
- लॉगिन केल्यावर या युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा Registration Form उघडेल जो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे.
- फॉर्म भरल्यावर वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील आणि शेवटी सबमिट करायचे आहे.
- सबमिट केल्यावर, माझा लाडका भाऊ योजना साठी तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
आपल्याला जर फॉर्म भरायचा माहित नसेल तर जवळच्या सायबर कॅफे मध्ये जाऊन फॉर्म भरून घ्यावा म्हणजे काही चुका होणार नाहीत. त्यासाठी सोबत काही कागदपत्रे घेऊन जा ते कोणते हे मी खाली देत आहे.
माझा लाडका भाऊ योजना कागदपत्रे
लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्यासाठी काही कागदपत्रे असणे अनिवार्य आहे जे खालीलप्रमाणे आहेत –
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- चालक परवाना
- पत्त्याचा पुरावा/ रहिवासी दाखला
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक खाते पासबुक
निष्कर्ष
माझा लाडका भाऊ योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. आपल्यापैकी ज्यांना अर्ज भरायचा असेल त्यांनी भरून घ्यावा. मला आशा आहे की आपल्याला माझा लाडका भाऊ योजना बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. वरील पोस्ट वाचून तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता.
आजचा हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत किंवा गावातील व्हॉट्सॲप ग्रुप वरती नक्की शेअर करून त्यांना योजनेबद्दल जागरूक करा. योजनेसंबंधी काहीही शंका असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता.
Maza Ladka Bhau Yojana Website | rojgar.mahaswayam.gov.in |
Website Homepage | RahulHelps.in |
WhatsApp Group | Click to Join |