Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने महाराष्ट्रात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनावा, त्यांना आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Maharashtra Apply Online या योजनेद्वारे महिलांना महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख आपल्यासाठीच आहे. आजच्या लेखात आपण मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना साठी अर्ज कसा करायचा, Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply कसे करायचे हे पाहणार आहोत.
माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा करावा? Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply प्रक्रिया ही 1 जुलै पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन सुरू झालेली आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्यांनी आपला फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकाकडे जमा करून अर्ज भरून घ्यायचा आहे. आपला फॉर्म लवकरात लवकर भरावा म्हणजे योजनेचे पैसे आपल्याला लवकर मिळतील. या योजनेचा अर्ज आपण घरबसल्या करू शकता तो कसा करायचा हे या लेखात दिलेले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा लेख वाचा – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन फॉर्म Narishakti Doot या ॲपवरती किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती भरता येत आहेत, त्यामुळे आजच्या पोस्टमध्ये आपण Narishakti Doot या ॲपच्या मदतीने आणि अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज कसा करायचा, Mazi Ladki Bahin Yojana Online Apply हे पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply करण्याची प्रक्रिया पाहुयात.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply – Narishakti Doot App
१) नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करा
आपण आपल्या मोबाईलवरून घरबसल्या माझी लाडकी बहिन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
Mazi Ladki Bahin Yojana Online Apply करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन मध्ये Google Play Store वरून Narishakti Doot ॲप इंस्टॉल करावे लागेल.
२) नोंदणी करून लॉगिन करा
आता तुम्हाला Narishakti Doot ॲपमध्ये तुमची नोंदणी करावी लागेल, त्यासाठी तुमचा मोबाइल नंबर टाका आणि अटी व शर्ती स्वीकारल्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.
पुढे तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो Narishakti ॲपमध्ये टाका आणि verify OTP बटणावर क्लिक करून लॉगिन करा.
आता आपली प्रोफाइल बनवा त्यासाठी आपले नाव, ई-मेल, जिल्हा, तालुका, आणि नारीशक्तीचा प्रकार, हि माहिती भरा आणि जतन करा.
३) लाडकी बहीण योजना अर्ज उघडा
Narishakti Doot ॲपमध्ये नोंदणी करून लॉगिन केल्यांनतर, तुम्हाला Home पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये माझी लाडकी बहिन योजनेचा अर्ज उघडेल.
४) अर्जात विचारलेली माहिती भरा
आता तुम्हाला या अर्जामध्ये तुमचे नाव, पतीचे किंवा वडिलांचे नाव, तुमचा पत्ता, जिल्हा, तालुका, शहर इत्यादी सर्व माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर, तुम्हाला एक पर्याय मिळेल ज्यामध्ये विचारले जाईल की तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहात का? तुम्ही घेत असाल तर होय पर्याय निवडा आणि खाली रक्कम टाका आणि जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही पर्याय निवडा.
त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर बँकेचा IFSC कोड टाकावा लागेल. सर्व माहिती व्यवस्तीत आणि अचूक भरावी.
५) कागदपत्रे अपलोड करा
अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे त्यांनतर शेवटी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय दिला जाईल. त्यात सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
त्यासाठी कागदपत्रांची आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून व्यवस्थितरित्या क्रॉप करून घ्यावीत. Document वरील सर्व अक्षरे नीट दिसली पाहिजेत आणि दिलेल्या जागेत जे ते कागदपत्र अपलोड करावे.
अर्जदाराचा फोटो सुद्धा अपलोड करायचा आहे त्यासाठी मोबाईल कॅमेरा ने अर्जदाराचा सध्याचा फोटो काढून अपलोड करावा.
६) अर्ज सबमिट करा
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्हाला खाली दिलेल्या Accept Hamipatra Disclaimer पर्यायावर क्लिक करून “स्वीकारा” पर्याय निवडायचा आहे.
अर्ज जतन करण्यासाठी “माहिती जतन करा” पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढे एक OTP येईल तो प्रविस्ट करायचा आहे. अश्या प्रकारे आपला माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व्यवस्थितरीत्या पूर्ण झाला आहे.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply – Official Website
१) अधिकृत वेबसाईट खोला
महाराष्ट्र सरकारने आता माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ हि अधिकृत वेबसाईट सुरु केली आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात पहिले या वेबसाईट वरती जा.
२) नोंदणी करून लॉगिन करा
आपल्यासमोर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट चे होमपेज उघडेल.
पुढे वेबसाईटच्या मेनू मधून “अर्जदार लॉगिन” हा पर्याय असेल तो पर्याय निवडा.
आता लॉगिन करायचा फॉर्म दिसेल. लॉगिन करण्यासाठी आधी आपल्याला खाते बनवावे लागेल त्यासाठी खाली “Create Account” हा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
येथे विचारलेली सर्व माहिती भरा आणि Captcha Code टाकून “Signup” वरती क्लिक करा आणि OTP पडताळणी पूर्ण करा.
लॉगिन फॉर्म खोला आणि खाते बनवायला टाकलेला Mobile Number आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
३) लाडकी बहीण योजनेचा अर्ज खोला
आपल्या खात्यात लॉगिन केल्यावर मेनूमध्ये Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana हा पर्याय शोधा आणि त्यावर जा.
आता आपल्याला आधार क्रमांक विचारायला जाईल तो टाकावा. ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याचा आधार क्रमांक टाकावा आणि Captcha टाकून Validate Aadhaar वरती क्लिक करून OTP प्रक्रिया पूर्ण करावी.
४) अर्जात विचारलेली माहिती भरा
आता तुम्हाला या अर्जामध्ये तुमचे नाव, पतीचे किंवा वडिलांचे नाव, लग्नाआधीचे नाव, तुमचा पत्ता, जिल्हा, तालुका, शहर इत्यादी सर्व माहिती द्यावी लागेल. त्यानंतर, तुम्हाला एक पर्याय मिळेल ज्यामध्ये विचारले जाईल की तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहात का? Are you a beneficiary of any other financial schemes implemented by State/Central Government? तुम्ही घेत असाल तर होय पर्याय निवडा आणि खाली रक्कम टाका आणि जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही पर्याय निवडा.
त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर बँकेचा IFSC कोड टाकावा लागेल. सर्व माहिती व्यवस्तीत आणि अचूक भरावी. Is your bank account seeded with Aadhaar?. (If your bank account is not seeded then seed your bank account with Aadhar.)* म्हणजे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का? नसेल तर लिंक करून घ्या आणि नंतर अर्ज करा.
५) कागदपत्रे अपलोड करा
अर्जामध्ये सर्व माहिती भरायची आहे त्यांनतर शेवटी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय दिला जाईल. त्यात सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
त्यासाठी कागदपत्रांची आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून व्यवस्थितरित्या क्रॉप करून घ्यावीत. Document वरील सर्व अक्षरे नीट दिसली पाहिजेत आणि दिलेल्या जागेत जे ते कागदपत्र अपलोड करावे.
अर्जदाराचा फोटो सुद्धा अपलोड करायचा आहे त्यासाठी मोबाईल कॅमेरा ने अर्जदाराचा सध्याचा फोटो काढून अपलोड करावा.
६) अर्ज सबमिट करा
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुम्हाला खाली दिलेल्या Accept Disclaimer of Hamipatra पर्यायावर क्लिक करून “Submit” पर्याय निवडायचा आहे.
अर्ज जतन करण्यासाठी “Save” पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढे एक OTP येईल तो प्रविस्ट करायचा आहे. अश्या प्रकारे आपला माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व्यवस्थितरीत्या पूर्ण झाला आहे.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी हा लेख वाचा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज आणि हमीपत्र डाउनलोड
निष्कर्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू महिलांसाठी एक उत्तम योजना आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक सहाय्य मिळेल आणि त्यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल. मी सर्व पात्र महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करतो. आजच्या पोस्टद्वारे मी Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 कसे करायचे याची प्रक्रिया सांगितली आहे.
मला आशा आहे कि आपल्याला सर्वाना Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 कसे करायचे हे समजले असेल. या लेखाच्या मदतीने तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आपल्याला जर अर्ज भरताना काहीही अडचण येत असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि लेख आवडला असेल तर शेअर नक्की करा. धन्यवाद!