माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी | Mazi Ladki Bahin Yojana Beneficiary List 2024

WhatsApp Group Join Group

Mazi Ladki Bahin Yojana List 2024, Mazi Ladki Bahin Yojana यादी 2024: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेची अर्ज प्रक्रिया १ जुलै पासून चालू झालेली आहे. राज्यातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे. आता या माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्यांनी अर्ज भरले आहेत ते सर्वजण आपले अर्ज मंजूर झाले का नाही हे तपासण्यासाठी Mazi Ladki Bahin Yojana Beneficiary List शोधत आहेत.

आजच्या लेखात आपण लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी PDF, Mazi Ladki Bahin Yojana List 2024 पाहणार आहोत. ज्या महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीत आपले नाव तपासण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची आहे, त्यांनी हा लेख पूर्ण वाचावा. महत्वाचे असे कि सर्वांना वाटत आहे कि सरकारने या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केली आहे परंतु असे नाही. याची वेगळी यादी आलेली नाही, परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग पैसे येणार कोणाला? कोणाचे अर्ज मंजूर झाले आणि कोणाचे नाही?


माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी | Mazi Ladki Bahin Yojana Beneficiary List

महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना लाभार्थी यादी तपासण्यासाठी घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही. सर्व महिला Mazi Ladki Bahin Yojana Beneficiary List PDF त्यांच्या मोबाईल फोनवरून घरी बसून तपासू शकतात.

महाराष्ट्रातील ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे त्या सर्व महिला घरी बसून नारी शक्ती दूत ॲपद्वारे किंवा लाडकी बहीण योजनेच्या आधिकारिक वेबसाईट द्वारे त्यांचे नाव तपासू शकतात. आपला Mazi Ladki Bahin Yojana List तपासण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे.


माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी – Narishakti Doot App

1) लाडकी बहिण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी सर्वात पहिले नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करून इंस्टॉल करा.

2) आता Narishakti Doot App खोला आणि आपला मोबाईल क्रमांक आणि ओटीपी टाकून लॉगिन करा.

3) Narishakti Doot App वरती लॉगिन केल्यावर आपल्याला खाली “यापूर्वी केलेले अर्ज” हा पर्याय दिसेल त्यावर जा.

4) “यापूर्वी केलेलं अर्ज” यामध्ये तुम्हाला तुम्ही केलेले सर्व अर्ज आणि त्यांचे Approval Status दाखवले जाईल. अश्या प्रकारे आपण लाभार्थी आहेत का नाही हे पाहू शकता.


माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी – Official Website

1) Mazi Ladki Bahin Yojana List मध्ये नाव पाहण्यासाठी सर्वात पहिले मोबाईलमध्ये Ladki Bahin Yojana Official Website खोला.

2) आता “अर्जदार लॉगिन” हा पर्याय निवडा आणि Mobile no आणि Password टाकून Captcha टाका आणि लॉगिन करा.

3) वेबसाईट वरती लॉगिन केल्यावर मेनूमध्ये “Applications Made Earlier” किंवा “यापूर्वी केलेले अर्ज” हा पर्याय दिसेल त्यावर जा.

4) यामध्ये तुम्हाला तुम्ही केलेले सर्व अर्ज आणि त्यांचे Approval Status दाखवले जाईल. Approved असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि तुमचे पैसे लवकरच येणार आहेत.


माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी PDF

1) आपण जर अंगणवाडीत किंवा सायबर कॅफेमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर वरील ऑनलाईन मार्गाद्वारे तुम्ही तुमचे नाव पाहू शकत नाहीत.

2) त्यासाठी अंगणवाडी सेविकेकडे किंवा ज्याच्याकडे फॉर्म भरला तेथे जाऊन चौकशी करा, कारण तुमचा अर्ज मंजूर झाला का नाही हि माहिती त्यांच्याकडे असते.

3) काही ठिकाणी ग्रामपंचायत द्वारे गावातील महिलांच्या Mazi Ladki Bahin Yojana List PDF देण्यात येत आहे. त्यात अर्ज मंजूर झालेल्या सर्वांची नावे असतात.

4) अश्या प्रकारे तुम्ही माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी घरबसल्या तपासू शकता आणि आपला अर्ज मंजूर झाला का नाही हे पाहू शकता.


माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी – District Wise

माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी काही जिल्ह्याच्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाऊ शकते. आपल्या जिल्ह्याच्या Municipal Corporation च्या वेबसाईट वरती हि यादी टाकण्यात येऊ शकते. ती तुम्हाला पाहता यावी यासाठी मी खाली त्यांच्या लिंक देत आहे. माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जिल्ह्यानुसार तपासण्याच्या लिंक मी खाली दिल्या आहेत. ज्या जिल्ह्याची यादी जाहीर होईल येथे अपडेट करून जोडण्यात येईल.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुळेयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोलायादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जळगावयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सातारायादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर/ अहिल्यानगरयादी पहा
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती
माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया – नारीशक्ती दूत अँप
माझी लाडकी बहीण योजना अर्ज स्थिती चेक
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र डाउनलोड
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी PDF
माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट

Leave a Comment