Namo Shetkari Yojana 4th Installment Date: नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार?

WhatsApp Group Join Group

Namo Shetkari Yojana 4th Installment Date 2024: नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि लहान शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत करत असते. या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी खूशखबर आहे. नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याची तारीख आली असून हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या योजनेंतर्गत दिलेली आर्थिक मदत दर चार महिन्यांच्या अंतराने दिली जाते. आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाने या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना तीन हप्त्यांचा निधी उपलब्ध करून दिला असून आता लवकरच चौथ्या हप्त्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाणार आहे. तुम्हीही नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Namo Shetkari Yojana 4th Installment Date 2024

लेखाचे नावNamo Shetkari Yojana 4th Installment Date
योजनानमो शेतकरी महा सम्मान निधी योजना  
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी 
नोंदणी प्रक्रियाऑनलाईन
आधिकारिक वेबसाइट  https://nsmny.mahait.org/

काय आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिला जात आहे.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारद्वारे दिलेली आर्थिक मदत दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात दिली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीचा लाभ मिळून आर्थिक संकट कमी होईल. या योजनेंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना तीन हप्ते अदा करण्यात आले आहेत.

नमो शेतकरी योजना चौथा हप्ता कधी येणार?

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना जारी केली असून नमो शेतकरी योजनेअंतर्गत तीन हप्त्यांचे पैसे यापूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. मात्र, नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जारी करण्यासाठी सरकारने तारीख दिली आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील. बातम्यांनुसार, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर होण्याची तारीख 25 जुलै 2024 होती परंतु हप्ता अजून आलेला नाही आणि पुढील तारीख जाहीर नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मोफत दिला जात आहे. जेणेकरून त्यांना त्यांची शेती व्यवस्थित आणि वेळेवर करता येईल.

नमो शेतकरी योजना लाभार्थी स्टेटस चेक कसे करावे?

  • सर्वात पहिले योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://nsmny.mahait.org/
  • अधिकारीक वेबसाईट ओपन झाल्यावर मुख्यपृष्ठावरील Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला एका नवीन पेज वर पाठवले जाईल जेथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि Captcha Code प्रविष्ट करून Get Mobile OTP वरती क्लिक करावे.
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो बॉक्समध्ये टाकावा आणि Show Status वरती क्लिक करावे.
  • नमो शेतकरी योजना 2024 च्या चौथ्या हप्त्यासाठी लाभार्थी स्थिती स्क्रीनवर दाखवली जाईल. अश्या प्रकारे तुम्हाला योजनेचा हप्ता मिळेल का नाही हे पाहू शकता.
Beneficiary Status Check Linkhttps://nsmny.mahait.org/
Website HomepageRahulHelps.in
WhatsApp GroupClick to Join

Leave a Comment