PM SVANidhi Yojana in Marathi: काय आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना? पात्रता, लाभ आणि कसा करायचा अर्ज

WhatsApp Group Join Group

PM SVANidhi Yojana in Marathi: आपल्या भारत देशात रस्त्यावर वस्तू विकून थोडेफार पैसे कमावून घर चालवणारे खूप लोक आहेत. असे लोक रस्त्यावर हातगाड्या उभ्या करून माल विकून आपला रोजचा उदरनिर्वाह करतात. कोरोना महामारी आपल्यामुळे अनेकांना हा व्यवसाय सोडावा लागला. अश्या लोकांना पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरु करण्यास मदत मिळावी म्हणून सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सरकार अश्या व्यावसायिकांना 10 हजार पासून 50,000 पर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे.

आपण जर लघुउद्योग करत असाल आणि आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर सरकारची PM SVANidhi Yojana in Marathi आपल्यासाठी अतिशय फायद्याची आहे. या योजनेद्वारे लोन काढून आपण आपला व्यवसाय सुरु करू शकता. आजच्या लेखात मी तुम्हाला PM SVANidhi Yojana ची संपूर्ण माहिती देणार आहे. पीएम स्वानिधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे सुद्धा खाली दिले आहे, म्हणून हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला PM SVANidhi Yojana ची संपूर्ण माहिती मिळेल.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना माहिती PM SVANidhi Yojana in Marathi

योजनेचे नावप्रधानमंत्री स्वनिधी योजना
सुरु केल्याची तारीख1 जून 2020
सरकारकेंद्र सरकार
लाभार्थीनिम्न आणि मध्यमवर्गीय व्यापारी
उद्देश्यरस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज देऊन रोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे
किती मिळणार कर्ज 50,000 रुपयांपर्यंत
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://pmsvanidhi.mohua.gov.in/

PM SVANidhi Yojana काय आहे?

प्रधानमंत्री स्वनिधी योजना ची सुरुवात गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 2020 मध्ये केली. या योजनेच्या माध्यमातून रस्त्यावरील व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांचा व्यवसायासाठी कर्ज दिले जाणार आहे. प्रधानमंत्री स्वानिधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज स्वस्त व्याजदरात दिले जाते आणि व्याज अनुदानाचा लाभही दिला जातो. जर एखाद्या अर्जदाराने या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची वेळेपूर्वी परतफेड केली तर त्याला 7% पर्यंत व्याज अनुदान दिले जाते आणि कोणत्याही प्रकारचा दंडही भरावा लागत नाही.

आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लाभार्थ्यांना पीएम स्वानिधी योजनेचा लाभ मिळाला आहे. पीएम स्वानिधी योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, पथ विक्रेते, फळ भाजी विक्रेते इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व प्रकारच्या छोट्या व्यापाऱ्यांना कोणतीही हमी न देता कर्ज दिले जाते. लाभार्थ्यांना प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत व्याज अनुदानासह 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड केल्यास, अर्जदाराला 7% पर्यंत व्याज अनुदान दिले जाते आणि त्याला कोणताही दंड भरावा लागत नाही.

PM SVANidhi Yojana उद्देश

पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत देशातील सर्व रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे रोजगार मिळत नसल्याने स्वतःचा रोजगार व्यवसाय सुरू करतात. पण कोविड-19 महामारीमुळे अनेकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. त्यामुळे या सर्वांचे जगणे कठीण झाले आहे. त्या सर्व लोकांना पुन्हा रोजगार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

पीएम स्वानिधी योजनेद्वारे, सर्व रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज देऊन रोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या योजनेंतर्गत सर्व विक्रेते कर्ज घेऊन त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करू शकतील. तसेच सरकारी योजनांतर्गत डिजिटलायझेशनला प्रोत्साहन द्यायचे आहे. या योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास सरकारकडून 7% अतिरिक्त अनुदान दिले जाईल.

PM SVANidhi Yojana पात्रता निकष

PM Svanidhi Yojana ही देशातील सर्व रस्त्यावरील विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी आहे. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

  • अर्ज करणारा लाभार्थी रस्त्यावर विक्री करणारा भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदाराकडे शहराने जारी केलेल्या विक्रीचे प्रमाणपत्र असावे.
  • अर्जदाराचे सर्वेक्षण मध्ये नाव असेल आणि प्रमाणपत्र नसेल त्यांचे तात्पुरते प्रमाणपत्र बनवले जाईल.
  • अर्जदाराकडे बाकीची सामान्य कागदपत्रे असावीत, जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, ई

PM SVANidhi Yojana ऑनलाईन अर्ज कसा करावा?

आपल्याला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. PM SVANidhi योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपले आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असावे. PM SVANidhi Yojana Online अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा.

1) सर्वात पहिले पीएम स्वनिधी योजना ची अधिकृत वेबसाईट आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर वरती खोलावे आणि पहिल्यांदा या योजनेचा लाभ घेत असाल तर होमपेज वरील Apply Loan 10K पर्यायावर जावे.

PM SVANidhi Yojana

2) आता समोर लॉगिन फॉर्म उघडेल, तेथे दिलेल्या जागेत आपला मोबाईल नंबर आणि Captcha कोड टाकावा आणि Request OTP वरती क्लिक करावे आणि आलेला OTP टाकून लॉगिन करावे.

PM SVANidhi Yojana

3) लॉगिन झाल्यावर आपल्याला Do You Have Aadhaar Card? असे विचारले जाईल तेथे Yes करावे. Yes केल्यावर आपल्याला Vendor ची Category निवडायची आहे. जी तुमच्या प्रमाणपत्रावर असेल आणि SRN क्रमांक टाकून Next वरती जावे.

PM SVANidhi Yojana

4) Next वरती गेल्यावर PM SVANidhi Application Form उघडेल. त्यात विचारलेली सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे भरायची आहे. माहिती भरताना काहीही चुकता कामा नये. 

PM SVANidhi Yojana

5) Application Form भरून झाल्यावर Upload Document विभागात यावे आणि विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. कागदपत्रे तुम्ही फोन मध्ये स्कॅन करून त्यांचा फोटो किंवा PDF अपलोड करू शकता.

PM SVANidhi Yojana

6) शेवटच्या स्तेपमध्ये PM SVANidhi Application Form नीट तपासा काही चूक नाहीत याची खात्री करा आणि Application Submit करा. Application Submit केल्यानंतर आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्ज केल्याचा संदेश येईल.

PM SVANidhi Application Status Check कसे करावे?

PM SVANidhi योजनेचा फॉर्म भरल्यावर आपला अर्ज मंजूर झाला का नाही हे तपासणे आवश्यक असते. PM SVANidhi Application Status तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

1) सर्वात आधी PM SVANidhi योजनेची अधिकृत वेबसाईट आपल्या मोबाईल वर खोला.

PM SVANidhi Yojana

2) आता होमपेज वरील Know Your Application Status या पर्यायावर जा.

3) पुढे दिलेल्या जागेत आपला अर्ज क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका आणि Request OTP पर्याय निवडा.

PM SVANidhi Yojana

4) आपल्या मोबाईल वरती OTP येईल तो टाका आणि Search पर्याय निवडा.

5) Search केल्यावर आपल्याला आपल्या PM SVANidhi योजनेच्या अर्जाची स्थिती दाखवली जाईल.

PM SVANidhi Yojana आवश्यक कागदपत्रे

आपण जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल आणि अर्ज भरायचा असेल तर आपल्याला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल. PM SVANidhi योजनेचा अर्ज भरण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल –

  • आधार कार्ड
  • बँक खाते
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला

PM SVANidhi Yojana लाभ आणि फायदे

PM SVANidhi Yojana योजनेअंतर्गत दिलेल्या जाणाऱ्या रकमेचे फायदे आणि लाभ खालीलप्रमाणे आहेत –

  • रस्त्यांवर व्यवसाय मजुरांना या योजनेंतर्गत निधी दिला जाईल, जेणेकरून ते आपला व्यवसाय अधिक प्रगत करू शकतील.
  • PM SVANidhi Yojana योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 10,000 ते 50,000 पर्यंत आहे.
  • तसेच, PM SVANidhi Yojana या योजनेंतर्गत सर्व कामगार आणि मजुरांना 7% पूर्ण अनुदान मिळेल.
  • जे मजूर वेळेवर कर्ज भरतील त्यांना पुढील वेळी 20,000 ते 50,000 रुपये कर्ज दिले जाईल.
  • दुसरीकडे, डिजिटल व्यवहार करणाऱ्या म्हणजे गूगल पे, फोन पे, ई करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांना वार्षिक कॅशबॅक सुद्धा दिला जाईल.

निष्कर्ष

आजच्या लेखात मी तुम्हाला पीएम स्वनिधी योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे. PM SVANidhi Yojana in Marathi या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात. असे अनेक फुटपाथ विक्रेते आहेत जे भांडवलाअभावी आपले काम करू शकत नाहीत. सरकार आता या योजनेंतर्गत कर्ज देऊन त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करेल. जेणेकरून त्याला चांगले उत्पन्न मिळू शकेल.

तुम्ही जर रस्त्यावरील विक्रेता असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. PM SVANidhi Yojana Marathi संबंधित काहीही अडचण असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता. जर तुम्हाला PM SVANidhi Yojana Marathi माहिती आवडली असेल तर कृपया तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हा लेख नक्की शेअर करा आणि अश्याच प्रकारच्या सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा.

Leave a Comment