Ayushman Card Online Apply 2024: काय आहे आयुष्मान भारत कार्ड, पात्रता, कसा करायचा अर्ज?

WhatsApp Group Join Group

Ayushman Card Online Apply 2024: आपल्या घरातील कोणी आजारी पडले तर उपचार करायला किती पैसे लागतात याचा अंदाज तुम्हाला असेल आणि जर आजार मोठा असेल तर विचारूच नका. आपण जीवनभर केलेली पैशाची बचत एका आजाराच्या उपचारात खर्च होऊ शकते, असे होऊ नये यासाठी केंद्र सरकारने Ayushman Bharat Card Yojana आणलेली आहे, जी तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना मोफत उचार प्रदान करते. आयुष्मान भारत योजना ही देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे.

या योजनेअतर्गत अंतर्गत सरकार लाभार्थ्यांना ₹5,00,000 पर्यंतचा मोफत आरोग्य विमा देत आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 30 कोटी नागरिकांनी Ayushman Bharat Card बनवले आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला Ayushman Card Apply Online 2024 करावे लागेल. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाख पर्यंतचा आरोग्य उपचार मोफत मिळवून दिला जातो. त्यासाठी महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे.

Ayushman Card Online Apply 2024: काय आहे आयुष्मान भारत कार्ड, पात्रता, कसा करायचा अर्ज?

आजच्या लेखात मी तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, सोबतच येथे आपण आयुष्मान कार्ड ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया Ayushman Card Online Apply पाहणार आहोत. आयुष्मान कार्ड बद्दल संपूर्ण माहिती येथे मिळणार आहे त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. लेखातील माहिती महत्वाची वाटली असेल तर सोशल मीडिया वरती मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर चला पोस्ट सुरु करूयात.

Ayushman Bharat Card Online (PMJAY Card)

आयुष्मान भारत कार्ड ज्याला आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) असेही म्हणतो. आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची एक योजना आहे जी गरीब कुटुंबांना 5 लाखापर्यंत आरोग्य विमा प्रदान करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आयुष्मान कार्ड असले पाहिजे. सरकारद्वारे 2018 मध्ये या योजनेचा आरंभ करण्यात आला असून आतापर्यंत लाखो कुटुंबांना या योजनेचा फायदा झाला आहे. 

आयुष्मान भारत योजना साठी जे पात्र आहेत त्यांना हे कार्ड दिले जाते कार्ड दवाखान्यात दाखवून तुम्ही 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार करू शकता देशातील 13000 नामांकित दवाखान्यांमध्ये  हे कार्ड स्वीकारले जाते  या कार्डद्वारे कॅन्सर आणि हृदयरोग अशा मोठ्या आजारांसोबत 1500 आजारांच्या उपचाराची सुविधा दिली जाते तर चला आता हे कार्ड बनवण्यासाठी काय पात्रता लागते हे पाहूयात.

Ayushman Card Online Apply Eligibility

 आयुष्मान कार्ड नोंदणी करण्यासाठी उमेदवार खालील Ayushman Card Online Apply Eligibility पूर्ण करीत असावा. 

  • भारतातील कायमस्वरूपी रहिवासीच आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकतात.
  • योजनेचा लाभ तुम्ही बीपीएल प्रवर्गात येणाऱ्या दुर्बल घटकात यायला हवे, म्हणजे वार्षिक कुटुंब उत्पन्न ₹2.4 लाख पेक्षा कमी असावे.
  • ज्या कुटुंबात 16 ते 59 वर्षे वयोगटातील कोणताही कमावणारा सदस्य नाही.
  • जर तुमचे नाव सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना 2011 च्या डेटाबेसमध्ये असेल तर तुम्ही पात्र आहात.
  • जर तुम्हाला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत राशन कार्ड मिळत असेल तर तुम्ही पात्र आहात.
  • अति मागासवर्गीय कुटुंबे किंवा भूमिहीन कुटुंबे ज्यांची कुटुंबाची उत्पन्न मुख्यत्वे शारीरिक श्रमावरून होते.

Ayushman Card Online Apply 2024

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड बनवणे आवश्यक असते ते बनवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो कसा करायचा हे आम्ही खाली सांगितले आहे. Ayushman Card Online Apply 2024 करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी सर्वात पहिले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची pmjay.gov.in ही वेबसाईट आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर वरती ओपन करावी.
  •  योजनेच्या अधिकारीक वेबसाईट वरती Am I Eligible  हा पर्याय शोधावा आणि आपण योजनेसाठी पात्र आहे का नाही हे तपासावे.
  • जर आपण या योजनेसाठी पात्र असाल  तर खाली दिलेले कागदपत्रे घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात  फॉर्म भरण्यासाठी जावे किंवा आपल्याला जर फॉर्म भरता येत असेल तर स्वतः भरावा.
  • आपले सरकार सेवा केंद्रात तुम्हाला जी जी माहिती विचारली जाईल ती द्यावी असे नाव घरचा पत्ता मोबाईल नंबर इत्यादी.
  • आता आपली सर्व माहिती पडताळली जाईल आणि तुमचा अर्ज सबमिट केला जाईल.
  •  यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावरती तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड मिळेल यामध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो त्याला UHID Number असे म्हणतात
  • आता आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा या वापर सरकारी दवाखान्यात किंवा खाजगी दवाखान्यात करू शकता.

Documents for Ayushman Card Apply

आयुष्मान भारत कार्ड बनवण्यासाठी  किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनासाठीअर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल. आपले सरकार सेवा केंद्रात जाताना खालील कागदपत्रे घेऊन जावीत.

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • मोबाईल नंबर
  •  बँक पासबुक
  •  पासपोर्ट साईज फोटो

Benefits of Ayushman Bharat Card

आयुष्मान कार्ड योजना ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनांपैकी एक आहे. आयुष्मान कार्ड द्वारे हे लाभ नागरिकांना मिळतात, या कार्ड चे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

  • Ayushman Bharat Card द्वारे प्रति कुटुंब 5 लाख पर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो.
  • योजनेस पात्र कुटुंबांना Cashless Hospitability सुविधा मिळते.
  • हॉस्पिटल मधून सुटल्यावर तीन वेळा Pre Hospital Coverage मिळते म्हणजे औषधांची पैसे मिळतात.
  • कौटुंबिक आकार, लिंग किंवा वय यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
  • कुटुंबातील सदस्यांची संख्या लिंग आणि वय यावर कोणतेही निर्बंध नाहीत.
  • देशभरातील कोणत्याही सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात या कार्डच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.
  • Ayushman Bharat Card योजनेत 1500 वैद्यकीय आजारांचा आणि शस्त्रक्रिया चा समावेश आहे.

या कार्डच्या फायद्यात उपचार सेवा, औषधे, खोलीचे शुल्क, डॉक्टरांचे शुल्क, सर्जनचे शुल्क, पुरवठा, ICU आणि OT शुल्क यांचा समावेश होतो.

Importat Links
Ayushman Bharat YojanaAyushman Card Balance Check
Ayushman Card Hospital List
Ayushman Card Download Online
Ayushman Card Online Applypmjay.gov.in
HomepageRahulHelps.in

निष्कर्ष

आजच्या पोस्टमध्ये आपण पाहिले की आयुष्मान कार्ड ऑनलाईन अर्ज कसा करायचा, Ayushman Card Online Apply, यासोबत आपण पाहिले की आयुष्मान कार्ड काढण्यासाठी काय पात्रता लागते कोण कोणती कागदपत्रे लागतात आणि आयुष्मान कार्डाचे सामान्य नागरिकाला कोणते फायदे होतात. मी आशा करतो की तुम्हाला ही पोस्ट व्यवस्थित रित्या समजली असेल आपल्याला जर पोस्ट संबंधित काही अडचण असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा

Ayushman Card Online Apply या लेखातील माहिती उपयुक्त वाटली असेल तर सोशल मीडियाद्वारे मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि सरकारी योजना संबंधी च माहिती आणि अपडेट मिळवण्यासाठी RahulHelps.in या वेबसाईटवर पुन्हा येत रहा. आमचे नवीन नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद!

Leave a Comment