Solar Rooftop Yojana 2024 काय आहे? अशी करा ऑनलाईन नोंदणी (PM Surya Ghar Muft Bijli Yojana)

WhatsApp Group Join Group

Solar Rooftop Yojana Marathi – भारताची लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसेच ऊर्जेची मागणी वाढत आहे या कारणामुळे सर्वांना वीज उपलब्ध करून देण्याचे मोठे आवाहन वीज उद्योगासमोर आहे. या आव्हानासोबतच पर्यावरणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी सौर ऊर्जा हा एक उत्तम मार्ग आहे. सौर ऊर्जा निर्मिती प्रक्रिया पर्यावरणास अनुकूल असते म्हणजे यामुळे पर्यावरणाला कसलेही नुकसान पोहोचत नाही. सौर ऊर्जा हि पर्यावरणपूरक आणि कधी न संपणारी असते, ती तयार करण्यासाठी सोलर पॅनल बसवावे लागतात.

सौर ऊर्जा बनवण्यासाठी जे सोलर पॅनल लागतात त्याची किंमत खूप असते आणि सर्वसामान्यांना ती परवडत नाही. सोलर पॅनल महाग असतात त्यामुळे घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी खूप खर्च येतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने Solar Rooftop Yojana किंवा PM Surya Ghar Muft Bijli Yojana ची सुरुवात केली. PM Surya Ghar Muft Bijli Yojana द्वारे सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी सबसिडी प्रदान केले जाते, ज्यामुळे सर्वसामान्य जनता सौर ऊर्जा वापरायला सुरुवात करेल आणि देशातील ऊर्जेची समस्या कमी होण्यास मदत होईल.

Solar Rooftop Yojana काय आहे? अशी करा ऑनलाईन नोंदणी (PM Surya Ghar Muft Bijli Yojana)

आजच्या या लेखात आपण Solar Rooftop Yojana Marathi, PM Surya Ghar Muft Bijli Yojana, मोफत सौर पॅनल स्कीम, सौर पॅनल योजना ची माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण या योजनेचे उद्दिष्टे, फायदे, पात्रता निकष, आणि योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहूयात.

सोलर रुफटॉप योजना 2024 (PM Surya Ghar Muft Bijli Yojana)

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे. वीज उत्पादनाच्या बाबतीत भारताला स्वावलंबी बनवणे हा Solar Rooftop Yojana चा उद्देश आहे. देशात सौरऊर्जेचा वापर वाढवावा लागेल जेणेकरून वीज आणि अपारंपरिक संसाधनांचा वापर कमी करता येईल. सौर रूफटॉप योजनेद्वारे सरकार अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देईल.

या योजनेंतर्गत, सर्व नागरिकांना सोलर रूफटॉप बसवण्यासाठी अनुदानाची सुविधा दिली जाईल, जेणेकरून प्रत्येकाला जास्तीत जास्त सौर रूफटॉप बसवता येतील. या सोलर रूफटॉप योजनेद्वारे तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवू शकता आणि यासाठी तुम्हाला सरकारकडून सबसिडी दिली जाईल. कोणताही नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. या योजनेद्वारे तुम्ही एका वर्षात अंदाजे 72000 रुपयांची बचत करू शकता.

योजनेची महत्वाची उद्दिष्ट्ये (Solar Rooftop Yojana Objectives)

भारत सरकारने सोलर रूफटॉप योजना सुरू केली आहे, ज्याचा उद्देश देशभरातील घरे आणि व्यवसायांमध्ये सौर ऊर्जा प्रणालींचा वापर वाढवणे हा आहे. ही योजना अनेक देशविकास आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करते –

 • भारताला ऊर्जा आयातीवर अवलंबून राहणं कमी करून, स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांकडे वळणे.
 • पर्यावरणाला हानी इंधन कमी करणे कमी करून हवामान बदलाशी लढणे.
 • घरांमध्ये आणि व्यवसायांमध्ये विजेचा खर्च कमी करणे.
 • सौर ऊर्जा क्षेत्रात नवीन संधी आणि रोजगार निर्माण करणे.
 • ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना वीज पुरवठा करणे.
 • देशात सौर ऊर्जेचा वापर आणि उत्पादन वाढवणे आणि ऊर्जा क्षेत्रात देशाला मजबूत बनवणे.

अनुदान किती मिळते? (Solar Rooftop Yojana Subsidy)

PM Muft Bijli Yojana द्वारे छतावरील सौर पॅनेल लावण्यासाठी शासनाकडून खालीलप्रमाणे अनुदान देईल –

 • 2 किलोवॅटपर्यंत – रु. 30,000 प्रति किलोवॅट
 • अतिरिक्त क्षमतेसाठी 3 किलोवॅटपर्यंत – रु. 18,000 प्रति किलोवॅट
 • 3 किलोवॅट पेक्षा जास्त क्षमतेसाठी एकूण अनुदान – जास्तीत जास्त रु. 78,000
सरासरी मासिकयोग्य छतवरील सौर ऊर्जा संयंत्राची क्षमतासबसिडी
0-150 युनिट्स1-2 किलोवॅटरु. 30,000 ते रु. 60,000
150-300 युनिट्स2-3 किलोवॅटरु. 60,000 ते रु. 78,000
300 पेक्षा जास्त युनिट्स3 किलोवॅट पेक्षा जास्तरु. 78,000

पात्रता निकष कोणते? (Solar Rooftop Yojana Eligibility)

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार खालील पात्रता निकष पूर्ण करीत असावा –

 • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
 • अर्जदार गरीब आणि मध्यम-उत्पन्न कुटुंबातील असावा.
 • अर्जदाराकडे स्वतःचे घर असावे ज्याच्या छतावर सोलर पॅनल बसवता यावे.
 • अर्जदाराने दुसऱ्या कोणत्या सोलर अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा
 • अर्जदाराकडे वीज कनेक्शन असावे म्हणजे मीटर असावे.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा? (Solar Rooftop Yojana Apply Online)

PM Surya Ghar Muft Bijli Yojana साठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील चरणांचे अनुसरण करावे लागेल –

 • सौर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तेथे तुम्हाला PM Surya Ghar Muft Bijli Yojana पोर्टलवर नोंदणीशी संबंधित पर्याय दिसतील, ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
 • तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल आणि नंतर वीज वितरण कंपनी निवडावी लागेल. येथे तुम्हाला वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि इतर माहिती विचारली जाईल. तुम्हाला ती सर्व माहिती भरून सबमिट करावी लागेल.
 • यानंतर, लॉगिन संबंधित पर्यायावर क्लिक करून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला अर्ज उघडावा लागेल, आणि त्यावर संपूर्ण माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
 • त्यानंतर, डिस्कॉमच्या मंजुरीसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. मंजुरी मिळाल्यावर सोलर प्लांट बसवला जाईल. प्लांटशी संबंधित तपशील प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला नेट मीटरसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
 • आता एक कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल आणि तुम्हाला प्रमाणपत्र मिळताच, तुम्हाला पोर्टलवर बँक खात्याशी संबंधित माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि सबमिट करावी लागेल. काही दिवसांच्या प्रक्रियेनंतर, सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे (Documents For Solar Rooftop Yojana)

सोलर रुफटॉप योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल, त्यामुळे फॉर्म भरताना खालील कागदपत्रे जवळ असावी.

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट फोटो
 • मतदार ओळखपत्र
 • बँक पासबुक
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • वीज बिल
 • छताचे चित्र जेथे सौर पॅनेल बसवायचे आहेत.
 • फोन नंबर

योजनेचे होणारे विविध फायदे (Benefits of Solar Rooftop Yojana)

मुफ्त बिजली योजना, ज्याला PM Surya Ghar Muft Bijli Yojana म्हणूनही ओळखले जाते. ही योजना घरांमध्ये सौर ऊर्जा पॅनेल स्थापित करण्यासाठी सबसिडी देते. या योजनेचे अनेक फायदे आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे –

 • सौर ऊर्जेचे पॅनल बसवल्याने तुमच्या घराचे वीज बिल कमी येते, म्हणजे तुमचे विजेचे पैसे वाचतात आणि जर तुमची सौर पॅनल ची ऊर्जा जास्त होत असेल तर ती तुम्ही महावितरणाला विकू शकता.
 • सोलर रुफटॉप योजनेमुळे सौर ऊर्जा क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील जसे सौर पॅनल ची स्थापना देखभाल आणि दुरुस्ती यासाठी नवीन कामगाराचे आवश्यकता लागेल.
 • सौर ऊर्जा ही पर्यावरणाच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे कारण हा स्वच्छ ऊर्जा ऊर्जा स्त्रोत आहे, ज्यापासून कोणत्याही हरितगृह वायू उत्सर्जन होत नाही.
 • सोलर रुफटॉप योजना भारतात नूतनीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवण्यास मदत करेल. हे देशाला ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक आत्मनिर्भर बनवण्यास मदत करेल.
Important Links
PM Surya Ghar Muft Bijli YojanaOfficial Website
Solar Rooftop Yojana Apply OnlineApply Link
HomepageRahulHelps.in

– महत्वाचे प्रश्न –

1) सोलर रुफटॉप योजना काय आहे?

सोलर रूफटॉप योजना, ज्याला PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना म्हणूनही ओळखले जाते, ही भारत सरकारची एक योजना आहे जी घरांमध्ये सौर ऊर्जा पॅनेल बसणवण्यासाठी सबसिडी देते. या योजनेचा उद्देश भारतात स्वच्छ आणि नूतनीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवणे आहे.

2) सोलर रुफटॉप योजनासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

रूफटॉप सोलर योजनेची नोंदणी करण्यासाठी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आणि ‘Apply For Rooftop Solar’ बटणावर क्लिक करून अर्ज करू शकता.

3) सोलर रुफटॉप योजनेअंतर्गत सबसिडी किती मिळणार?

PM Muft Bijli Yojana द्वारे छतावरील सौर पॅनेल लावण्यासाठी शासनाकडून खालीलप्रमाणे अनुदान देईल – 2 किलोवॅटपर्यंत – रु. 30,000 प्रति किलोवॅट, 3 किलोवॅटपर्यंत – रु. 18,000 प्रति किलोवॅट, 3 किलोवॅट पेक्षा जास्त क्षमतेसाठी एकूण अनुदान – जास्तीत जास्त रु. 78,000

4) सरकार पूर्णपणे फुकट सौर पॅनल देत आहे का?

नाही, सरकार फक्त PM Muft Bijli Yojana या योजने अंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी काही प्रमाणात सबसिडी देत आहे.

5) सोलर रुफटॉप योजना नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

सोलर रुफटॉप योजना अर्ज करण्यासाठी ओळखीचा पुरावा, राहणाऱ्या जागेची कागदपत्रे, पत्त्याचा पुरावा, विजेचे बिल, अशी कागदपत्रे लागतात. याबद्दल विस्तारित माहिती वरती दिली आहे.

WhatsApp Group Join Group

Leave a Comment