Maharashtra Board SSC Result 2024 Check: कसा बघायचा दहावीचा बोर्डाचा निकाल?

WhatsApp Group Join Group

Maharashtra Board SSC Result 2024 Check Online – महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी एजुकेशन (MSBSHSE) द्वारे दरवर्षी इयत्ता दहावी साठी SSC Exam आयोजित केली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी हि परीक्षा देतात. SSC Exam हि खूप महत्वाची मानली जाते कारण या परीक्षेच्या मार्क्स वरती मुलांचे करियर निर्धारित असते.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही SSC ची परीक्षा घेण्यात आलेली आहे. 2024 मध्ये 1 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 यादरम्यान दहावीची SSC परीक्षा यशस्वीपणे पार पडली. यावर्षी 15 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली आणि आता सर्वजण SSC Result 2024 ची आतुरतेने वाट बघत आहेत.

गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, तेव्हापासून आता दहावीचे विद्यार्थीही निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत. आज म्हणजे 27 मे 2024 रोजी दुपारी 1 ला निकाल अधिकारीक वेबसाईट mahresult.nic.in वरती जाहीर केला जाईल. निकालाच्या दिवशी सर्व विद्यार्थी वेबसाईट वरती जाऊन आपला निकाल पाहू शकता.

Maharashtra Board SSC Result 2024 Check: कसा बघायचा दहावीचा बोर्डाचा निकाल?

आजच्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत कि महाराष्ट्र बोर्ड चा दहावीचा म्हणजेच SSC चा निकाल कसा पाहायचा?, आपल्याला माहिती आहे कि SSC Result 2024 Check करण्यात खूप जणांना अडचणी येतात त्यामुळे या पोस्टमध्ये आपण SSC Result 2024 कसा पाहायचा हे Step नुसार जाणून घेणार आहोत, त्यामुळे हि पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

Step 1 – दहावीचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी मोबाईल किंवा लॅपटॉप मधील कोणतेही ब्राउजर ओपन करावे.

Step 2 – आता सर्च बार चा उपयोग करून MSBSHSE च्या अधिकारीक वेबसाईट mahresult.nic.in वरती जावे.

Step 3 – आता mahresult.nic.in चे होमपेज ओपन होईल, त्यावर SSC Result 2024 च्या लिंक वरती क्लिक करावे.

Step 4 – तुम्हाला आता तुमचा SSC Result 2024 दाखवला जाईल.

Step 5 – आता SSC Result 2024 तुम्ही PDF च्या स्वरूपात सेव करून ठेवा किंवा शक्य असेल तर प्रिंट काढून ठेवा.

SSC Result 2024 तुम्ही खालील वेबसाईट वरती पाहू शकता –

  • mahresult.nic.in
  • sscresult.mkcl.org
  • msbshse.co.in

निष्कर्ष –

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला Maharashtra SSC Result 2024 Check Online कसा पाहायचा हे सांगितले आहे. निकाल पाहण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असतात, त्यामुळे आपल्याला जर काहीही अडचण असेल किंवा काही शंका असेल तर खाली कमेंट करून विचारू शकता आणि ज्यांना समस्येचं उत्तर माहित असेल ते कमेंट ला रिप्लाय पण देऊ शकता.

तर चला आता आपल्याला Maharashtra SSC Result 2024 Check Online कसा पाहायचा हे व्यवस्थितपणे समजले असेल. आपल्याला जर पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण निकाल पाहता येईल. Maharashtra SSC Result 2024 Check Online साठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

WhatsApp Group Join Group

Leave a Comment