Masked Aadhaar Card: काय आहे मास्क्ड आधार कार्ड आणि कसे करायचे डाउनलोड?

WhatsApp Group Join Group

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांच्या ओळखीचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणास्तव, यातील संवेदनशील माहितीचे संरक्षण आवश्यक आहे. याच कारणासाठी “Masked Aadhaar Card” हा नवा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

आजकाल, डेटा सुरक्षा ही एक गंभीर चिंता आहे. आधार कार्डसारख्या संवेदनशील माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने Masked Aadhaar Card नावाची नवीन सुविधा सुरू केली आहे.

Masked Aadhaar Card: काय आहे मास्क्ड आधार कार्ड आणि कसे करायचे डाउनलोड?

मास्क आधार कार्डमध्ये सर्व क्रमांक दिलेले नसतात, परंतु त्यामध्ये असलेल्या QR कोडवरून तुम्ही व्यक्तीची उर्वरित माहिती जसे की फोटो इत्यादी मिळवू शकता, परंतु आधार क्रमांक किंवा त्याच्याशी जोडलेली माहिती नाही. त्यामुळे तुमच्याकडून हे कार्ड मागणारी कोणतीही कंपनी त्याचा फायदा घेऊ शकत नाही.

मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय? ते कसे डाउनलोड करावे? आणि ते तुमच्या आधार कार्डची सुरक्षा कशी करते? या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण या सर्वांची माहिती घेणार आहोत. तर चला सुरु करूयात.

मास्क्ड आधार कार्ड

मास्क्ड आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या आधार कार्डाचे एक सुरक्षित आणि सुधारित स्वरूप आहे. यात आधार क्रमांकाच्या फक्त शेवटचे ४ अंक दिसतात, तर उरलेले अंक “xxxx-xxxx” अशा प्रकारे लपवलेले असतात.

या प्रकारामुळे तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते आणि फक्त आवश्यक तेवढीच माहिती शेअर केली जाते. मास्क्ड आधार कार्डाचा वापर साधारणतः ओळखीच्या पडताळणीसाठी केला जातो, ज्यामुळे तुमचा आधार क्रमांक सुरक्षित ठेवता येतो.

कसे डाउनलोड करायचे?

Masked Aadhaar Card डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

१) Masked Aadhaar Card डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी UIDAI च्या https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२) आता My Aadhaar विभागातून “Download Aadhaar” या पर्यायावर क्लिक करा.

३) तुमचा आधार क्रमांक दिलेल्या जागेत प्रविस्ट करा आणि Captcha टाकून Send OTP वरती क्लिक करा.

४) आता तुम्हाला Do you want masked Aadhaar? यावर टिक करा आणि आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाका.

५) पुढे OTP टाकल्यावर Verify and Download या पर्यायावर क्लिक करा.

६) आता तुमचे आधार कार्ड पीडीएफ फाईलमध्ये डाउनलोड होईल. डाउनलोड झालेल्या फाईल ला पासवर्ड असतो त्यासाठी तुमच्या नावाचे पहिले ४ अक्षर आणि जन्म वर्ष टाकावे.

उदा…

  • नाव – Rahul
  • जन्म वर्ष – 2001
  • पासवर्ड – RAHU2001

फायदे काय आहेत?

Masked Aadhaar Card चे फायदे खालीलप्रमाणे आहेत –

  • सुरक्षितता: या आधार कार्ड मध्ये संपूर्ण आधार नंबर दिलेला नसतो तरीही तुम्ही तुमची ओळख सिद्ध करू शकता, यामुळे तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होण्याचा धोका कमी होतो.
  • सोय: तुम्ही ते तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून वापरू शकता. मोबाईल मधेही आधार कार्ड ठेऊ शकता म्हणजे नेहमी सोबत ठेवण्याची गरज नाही.
  • गोपनीयता: तुम्ही तुमचा पूर्ण आधार क्रमांक कोणाला कळू द्यायचा नसेल तर Masked Aadhaar Card वापरणे उपयुक्त आहे.

निष्कर्ष

मास्क्ड आधार कार्डाच्या मदतीने, आपण आपली आधार संबंधित माहिती सुरक्षित ठेवू शकता आणि आवश्यक ठिकाणी वापरू शकता. या सोप्या प्रक्रियेने आपले आधार कार्ड सुरक्षित आणि गोपनीय ठेवणे सहज शक्य आहे.

मला आशा आहे कि तुम्हाला हा लेख माहितीपूर्ण वाटला असेल. आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा.

Leave a Comment